पुंडे सरांविषयी

डॉ. द. दि. पुंडे : व्यक्ति- परिचय

संपूर्ण नाव : दत्तात्रय दिनकर पुंडे

पत्ता : ४/९ अर्चनानगर, गणेशनगरजवळ, एरंडवन, पुणे ४११०३८ (दूरभाष- (०२०) २५४४८५०३)

पद : सेवानिवृत्त प्रपाठक, मराठी विभाग, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ४११००५.

जन्मदिनांक : २६ डिसेंबर १९३८

शिक्षण : बी.ए. (मराठी विशेष, संस्कृत दुय्यम), द्वितीय श्रेणी, पुणे विद्यापीठ, १९६५
एम.ए. (मराठी विशेष, संस्कृत दुय्यम), प्रथम श्रेणी, मुंबई विद्यापीठ, १९६९
पीएच.डी., पुणे विद्यापीठ, १९८०

प्रबंध विषय : वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) : एक चिकित्सक अभ्यास
प्रबंधास त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीची (१) डॉ. य. वि. परांजपे पारितोषिक
आणि (२) डॉ. वि. रा. करंदीकर पारितोषिक ही दोन्ही पारितोषिके प्राप्त.

अनुभव : 
.  प्रशासकीय-
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील शिक्षण व समाज कल्याण विभागात १.५.१९९८ ते ५.१.१९६४ या काळात लिपिक म्हणून ६ वर्षे आणि ६.१.१९६४ ते १४.६.१९७० या काळात साहाय्यक (उच्च स्तर) म्हणून ६ वर्षे सेवा.
आ. अध्यापनविषयक-

विशेष अभ्यासविषय : वाङ्मयेतिहासाचे तत्त्वज्ञान (Philosophy of Literary History) या विषयाचा गेली ३० वर्षे सातत्याने अभ्यास. याच विशेष अभ्यासाकरिता
(१) UGC कडून रु. ५२,०००/-चा अभ्यासप्रकल्प मंजूर, तसेच
(२) ‘महाराष्ट्र सारस्वत’ शताब्दी समिती, ठाणेकडून रु. २०,०००/-ची शिष्यवृत्ती प्रदान.
(दोन्ही अभ्यासप्रकल्प पूर्ण झालेले आहेत.)

विशेष नियुक्ती : १. साहित्य अकादमी (दिल्ली) तर्फे दिल्या जाणाऱ्या भाषा सन्मान पुरस्काराच्या ‘अभिजात व मध्ययुगीन भारतीय भाषां’साठीच्या ‘ज्यूरी’वर सदस्य म्हणून (डिसेंबर २००१) नियुक्ती.
२. बिर्ला फौंडेशन (दिल्ली) तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कारासाठीच्या समितीवर नियुक्ती (२००२, २००३).
३. राज्य मराठी विकास संस्था (मुंबई)च्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती (२००६-२००९).

विशेष सन्मान : मुंबई विद्यापीठातर्फे उत्तम संशोधक म्हणून ‘प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृती पारितोषिक’ (२००५)