कल्याण वासुदेव काळे : व्यक्ति- परिचय
संपूर्ण नाव : कल्याण वासुदेव काळे
पत्ता :: ए- ५, प्रज्ञानगड अपार्टमेंट, नवश्या मारुती गल्ली, सिंहगड रस्ता, पुणे ४११०३० ( संपर्क- दूरभाष - ०२०- २४२५३१३६ )
पद:: सेवानिवृत्त प्राध्यापक व विभागप्रमुख, मराठी विभाग, पुणे विद्यापीठ (सध्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), पुणे ४११००७
जन्म: १६ डिसेंबर १९३७; परांडा, जि. उस्मानाबाद
मृत्यू : १७ जानेवारी २०२१; पुणे
शिक्षण : एम.ए. (संस्कृत - भाषाविज्ञान ), १९६०
एम.ए. ( मराठी- अर्धमागधी ) १९६५
पीएच.डी. पुणे विद्यापीठ, मार्च १९७८.
प्रबंधविषय- परांड्याचे हंसराजस्वामी: जीवन, साहित्य आणि तत्त्वज्ञान ; मार्गदर्शक- मु.श्री.कानडे
सन्मान: महाराष्ट्र शासनाचा इ.स.२०१८ चा डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार.
अनुभव :
- अध्यापन-
- महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथे माध्यमिक स्तरावर अध्यापन ; इ.स. १९६० ते १९६६ .
- मराठी व संस्कृत या विषयांसाठी प्रथम व्याख्याता व त्यानंतर सहायक प्राध्यापक म्हणून जी.टी.पाटील
महाविद्यालय, नंदुरबार येथे अध्यापन; जून १९६६ ते मार्च १९७२.
- भारतीय भाषा संस्थान (सी.आय.आय.एल. ), म्हैसूर यांच्या पुण्यातील डेक्कन कॉलेज येथील पश्चिम भाषा
विभागीय केंद्रात (डब्ल्यू.आर.एल.सी.) मराठी भाषेचे व्याख्याता म्हणून अध्यापन.
- पुणे विद्यापीठाच्या (सध्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मराठी विभागात अधिव्याख्याता व पदोन्नतीनंतर
प्रपाठक म्हणून अध्यापनकार्य; प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून निवृत्त (एकूण कार्यकाल- डिसेंबर १९८१ ते डिसेंबर १९९७)
- संशोधन मार्गदर्शन- पीएच.डी. प्राप्त १६ विद्यार्थी , एम.फिल.प्राप्त ११ विद्यार्थी
- विशेष अभ्यासविषय-
- सर्वसाधारण मराठी साहित्य
- वेदांतविषयक संस्कृत साहित्य
- मराठी संतसाहित्य
- भाषाविज्ञान
- शैलीविज्ञान
- इतर शैक्षणिक कार्य-
- विविध विद्यापीठांमधील प्राध्यापकांसाठीच्या उद्बोधन व प्रशिक्षण वर्गांसाठीचे तज्ज्ञ मार्गदर्शक.
- विविध विद्यापीठांमध्ये, महाविद्यालयांमध्ये व संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक व तज्ज्ञ म्हणून व्याख्याने.
- राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांसाठी परीक्षक व प्राश्निक.
- यशदा, पुणे आयोजित आय.ए.एस. अधिकारी प्रशिक्षण वर्गात मराठीचे अध्यापन.
- विविध उपक्रमांमधील सहभाग-
- बऱ्हाणपूर, इंदौर (मध्य प्रदेश) व पुणे येथे प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाषेच्या अध्यापनाविषयी मार्गदर्शन.
- युनेस्कोच्या पाठ्यपुस्तक प्रकल्पाच्या द्विसदस्य़ीय मूल्यमापन समितीत सहभाग , १९८६-१९८८.
- बंगलोरमधील जागतिक बायबल भाषांतर केंद्रासाठी मराठीतील भाषांतर प्रकल्पाचे समन्वयक व अनुवादक म्हणून काम, १९९१ ते १९९७. प्रस्तुत भाषांतर प्रकाशित झाले आहे.
- मॉस्कोमध्ये १९९५ साली महाराष्ट्रीय संस्कृतीविषयी भरलेल्या आंतरराष्ट्रीय विद्वतपरिषदेसह अनेक परिषदा, कार्यशाळा व चर्चासत्रांमध्ये सहभाग.
- लेखन-
- विविध नियतकालिके, चर्चासत्र स्मरणिका, विशेषांक व संपादित ग्रंथ यांच्यामध्ये सुमारे २०० लेख प्रकाशित.
- स्वतंत्र व संपादित अशी २५ पुस्तके. त्यातील महत्त्वाची पुढीलप्रमाणे-
- परांड्याचे हंसराज स्वामी ; पुणे विद्यापीठ प्रकाशन; १९९१.
- Learning Marathi ; डॉ.अंजली सोमण यांच्या सहकार्याने; १९८६.
- भाषांतरमीमांसा ; डॉ.अंजली सोमण यांच्या सहकार्याने; १९८८.
- आधुनिक भाषाविज्ञान ; डॉ.अंजली सोमण यांच्या सहकार्याने संपादित; २००४.
- वैदिक देवता आणि संप्रदाय ; डॉ.शं.बा.जोशी यांच्या लेख संग्रहाचे संपादन, मानवधर्म प्रकाशन, धारवाड, वितरण व्हीनस प्रकाशन, पुणे ३०, २००४.
- हंसराज स्वामींच्या एकूण सुमारे २०,००० ओव्या असलेल्या १० पुस्तकांचे संपादन.
- मराठी अभ्यास परिषदेच्या भाषा आणि जीवन या नियतकालिकाचे संपादन; १९८९- १९९७. या नियतकालिकास १९९५ मध्ये रु.५०,०००/- चे पारितोषिक मिळाले.
- श्रीगुरूसेवा या धार्मिक नियतकालिकाचे तीन वर्षे संपादन.